सोलापूरकरांची स्वप्नपूर्ती; मोदी सरकारची शब्दपूर्ती !
सोलापूरकरांची स्वप्नपूर्ती; मोदी सरकारची शब्दपूर्ती !Ó
सोलापूर, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागासाठी महत्त्वाचं असणाऱ्या सोलापूर विमानतळाचे आज लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते व्हर्च्युअलपद्धतीने हे लोकार्पण झाले.
गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांचं असलेलं स्वप्न मा. मोदीजींच्या सरकारने पूर्ण केलं असून सोलापूर आता देशाच्या हवाई नकाशावर आलं आहे. जवळपास ६४.९५ कोटी रुपये खर्चून हे विमानतळ साकारले आहे.
आर्थिक विकासाला चालना देणे, उद्योगधंद्यांना पूरक पायाभूत सुविधा निर्माण करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करतानाच सोलापूरची कनेक्टिव्हिटी देशातील महानगरांसोबत राहावी, या उद्देशाने या विमानतळाची निर्मिती करण्यात आली आहे.
पंतप्रधान मा. मोदीजी यांनी ‘हवाई चप्पल घालणारा, आता हवाई सफर करेल’, असं सांगितलं होतं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात विमानतळांची निर्मिती सुरू आहे आणि यात ‘उडान’ ही योजना मैलाचा दगड ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यांतर्गत हवाई वाहतुकीला प्राधान्य, प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळात गेल्या दहा वर्षांत ३५९ हवाई मार्गांची निर्मिती झाली असून तब्बल ७४ नवीन विमानतळ साकारली गेली. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतीय हवाई क्षेत्राचा शब्दशः कायापालट झाला आहे.
देशाला साडेसात हजार किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून सी प्लेन नागरी वाहतुकीसाठी उपलब्ध करुन देण्याचं सरकारचे नियोजन आहे. म्हणूनच सी-प्लेनसंदर्भातील गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहेत.
विकसित भारत २०४७ साकारताना देशांतर्गत वाहतुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशाला क्रमांक एकवर आणण्याचं ध्येय ठेवण्यात आलं असून ४०० विमानतळ बांधण्याचा
ही निश्चय आहे.
Great congratulations indian present government jai hind.