विश्वकर्मा फाऊंडेशन व अहिल्यदेवी बहुदेशीय सहकारी संस्था आयोजित कार्यक्रम
- इच्छाशक्ती व कठोर परिश्रमाशिवाय यश नाही असे प्रतिपादन बसवेश्वर कृषि केद्राचे विठ्ठल गाढवे यांनी व्यक्त केले. विश्वकर्मा फाऊंडेशन व अहिल्यदेवी बहुदेशीय सहकारी संस्था आयोजित ⊗उद्योजक व्हा या कार्यक्रमात आपल्या ऊदघटन पर भाषणात व्यक्त केले यावेळी अध्यक्ष स्थानी असलेले प्रशांत बडवे यांनी कुठलाही उद्योग छोटा व मोठा नसतो व खुपशा उद्योगाला मोठ्या भांडवलची आवश्यकता नसते व असल्यास शासनाच्या विविध योजनाद्वारे आपणास उपलब्ध होऊ शकतात . ह्यामुळे नोकरीच्या मागे न लागता आपण उद्योजक बनावे असे आव्हान केले.
महेश रायखलकर यांनी उद्योगच का करावा साल्ट अनलेससदवारे स्वत:तील प्लस व मायनस गुण कोणते आहेत उद्योजक होण्यासाठी कोणते गुण लागतात ह्यांची माहिती दिली.
सचिन कांबळे यांनी एजन्सी लाईनमध्ये अगदी कमी पैशांमध्ये नोन ब्रडेड कंपनीचे एजन्सी कशी घेता येते व ब्रडेड कंपनीचे एजन्सी घेण्यासाठी किती पैसे लागतात त्याची व्यावसायिक साखळी कशी असते कंपनी आपल्यास काय मदत करते. या अशा अनेक विषयावर , माहिती दिली
रवि हलजगीकर यांनी भांडवल न लागणार्या अशा इन्शुरेंस, बँकिंग, फॅसिलिटीर, शेअर मार्केट व अन्य व्यवसायाबद्दल माहिती दिली
विनायक बंकापुरे यांनी गारमेंट व्यवसायामध्ये छोटे छोटे व्यवसाय कसे करता येतात जसे पंकिंग इस्तरी , काजा करणे , बटण लावणे , याच्यासह शिलाई व कटिग यांची माहिती दिली . डॉक्टर अमितकुमार देशपांडे यांनी शेती व शेतीला पूरक अशा विविध व्यवसायांची माहिती दिली.
या कार्यक्रमाला एकुण 45 शिबिरार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी केले. आभार सचिव रूपेश गायकवाड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर सुतार , तृप्ती सुपाते , श्रीकृष्णा गायकवाड नामदेव जगताप यांनी परिश्रम घेतले.