
सोलापूर -धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज*
विश्व हिंदू परिषदेच्या प्रमुख सात उत्सवांमध्ये धर्मरक्षा दिन या उत्सवाची योजना करण्यात आली आहे.
दिनांक २३ डिसेंबर हा स्वामी श्रद्धानंद जी सरस्वती यांचा बलिदान दिवस असल्यामुळे दिनांक २१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर आपण हे धर्मरक्षा पर्व साजरे करतो.धर्मविषयक जागृती, धर्मरक्षणासाठी आयुष्य समर्पित केलेल्या महापुरुषांचे स्मरण, त्यांच्या कार्याची समाजाला आठवण व जाणिव करून देणे, परावर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे तथा धर्मबांधव अन्य धर्मात जाऊ नये याकरिता प्रयत्न करणे अश्या विविध कार्यक्रमातून संपूर्ण विश्व हिंदू परिषद हा उत्सव, हे धर्मरक्षा पर्व उत्साहाने साजरे करते.
*यानिमित्ताने आपल्या मातृभूमी भारतमातेच्या सेवेकरीता देव, देश, धर्म, संस्कृती रक्षणाकरिता कर्तव्यकठोर होत, आपल्या जीवनाचा होम करणाऱ्या महापुरुषांच्या वीरगाथेचे जीवनयज्ञाचे आपण स्मरण करूयात व कर्तव्यबोध घेऊन कार्यरत होऊयात. त्यांचे स्मरण करून व त्यातून प्रेरणा घेऊन सर्वांनी देव, देश, धर्म, संस्कृती याकरीता कर्तव्यपरायण, कर्तव्यतत्पर व्हावे या उदात्त हेतूने हा लेख प्रपंच*
धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज हे एक यशस्वी राजे व हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या अल्प आयुष्यात वाट्याला आलेल्या कारकिर्ती मध्ये अनेक पराक्रम गाजवून खूप मोठे यश संपादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन देखील त्यांच्या वडिलांसारखेच देशाला व हिंदू धर्माला समर्पित होते.
छत्रपती संभाजी राजे यांचे जीवन लहानपणापासूनच संघर्षरत होते. जन्मानंतर २ वर्षातच माता सईबाईंचे निधन झाले. धाराऊ पाटिल या दूध आईच्या दूधावरच त्यांचे संगोपन झाले. छत्रपती संभाजी महाराजांचे पालनपोषण त्यांच्या आजी जिजामाता यांनी केले. ते त्यांच्याच तालमीत लहानाचे मोठे झाले.
पुत्रप्रेमामुळे त्यांना सावत्र आईच्या उपहासालाही अनेक वेळा सामोरे जावे लागले.परंतु याही परिस्थितीत त्यांना एका सावत्र आईचे खूप प्रेम मिळाले.
छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता यांनी त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचे व युद्ध लढाईचे प्रशिक्षण दिले. महाराज अतिशय हुशार, देखणे व रूबाबदार होते. संभाजी राजेंना लहान वयातच राजकारण कळायला लागले होते. प्रत्येक गोष्ट ते पटापट आत्मसात करित होते. राजेंना मोगलांचा कारभार, रणनिती व घडामोडी समजाव्यात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना प्रसिद्ध आग्रा भेटीसाठी सोबत नेले तेव्हा राजे केवळ नऊ वर्षांचे होते.
यावेळेस जेव्हा कैदेतून सुटले तेव्हा ते शिवाजी महाराजांचे मंत्री रघुनाथ कोरडे यांचे दूरचे नातेवाईकांच्या घरी एक ते दिड वर्षाकरिता थांबले होते. त्याकाळात राजे एक ब्राम्हण बालक म्हणून जीवन जगत होते. त्यामुळे मथुरेमध्ये त्यांचा उपनयन सोहळाही करण्यात आला. त्यांना संस्कृतही शिकविण्यात आले. याच कालावधीत त्यांची ओळख कवी कलश यांचेशी झाली. कवी कलश यांच्या संपर्कात आल्यामुळे राजेंची साहित्य रचनेतील आवड वाढू लागली. याच ज्ञानाचा वापर करुन त्यांनी अनेक ग्रंथ व पुस्तके लिहिली. *बुद्धभूषण* हा गाजलेला ग्रथ त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी लिहिला यावरुन त्यांच्या विद्वत्तेची आपणास कल्पना येईल.
*संभाजी महाराजांना मराठी, संस्कृत फारसी, ब्रज, उर्दू, अरबी व इंग्रजी यासारख्या अनेक भाषा बोलता, लिहिता व वाचता येत होत्या*.
छत्रपती संभाजी महाराज हे शंभू राजे म्हणून देखील ओळखले जातात. ते छत्रपती झालेत तेव्हा हिंदवी स्वराज्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणजे औरंगजेब व विजापूरचा आदिलशहा होते. राजेंना या शत्रूंना मुळासकट उखडून टाकायचे होते.
संभाजी महाराज आपल्या आयुष्यात एकूण २१० युद्ध लढलेत आणि एकाही युद्धात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले नाही. प्रत्येक युद्धात ते यशस्वीच झालेत.
*छत्रपती संभाजी महाराज एक धाडसी, ताकदवान आणि शक्तीशाली राजे होते. त्यांनी आपल्या छोट्याश्या जीवनातदेखील हिंदवी स्वराज्याचा मोठा विस्तार केला.*
*वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजितो दात असा त्यांचा बाणा होता*
*मोगलांच्या जुलमापासून त्यांनी हिंदू समाजाचे प्रजेचे कायम रक्षण केले*.महाराजांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याचा पराभव केला सोबतच बाकी मुगलांचा देखील पराभव केला. औरंगजेब महाराष्ट्रातील युद्धात व्यस्त असतांना उत्तर भारतातील हिंदू राज्यकर्ते यांना त्यांचे राज्य परत मिळविण्यासठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी बराच वेळ मिळाला. त्यामुळे दक्षिणेकडीलच नाही तर उत्तर भारतातील हिंदूही महाराजांचे ऋणी आहेत.
महाराज प्रत्येक युद्धात त्यांची शूरता दाखवत होते गनिमी काव्याचा पूरेपूर व योग्य उपयोग करीत त्यांनी सर्व शत्रूंना पाणी पाजले होते.
मोगल, पोर्तुगिज, ब्रिटिश आणि ईतर शत्रूंबरोबरच त्यांना अंतर्गत शत्रूंबरोबरही लढावे लागले.
*छत्रपती संभाजी महाराजांचे धर्मासाठी बलिदान*
छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश औरंगजेबाच्या तावडीत सापडल्यानंतर दोघांचेही अतोनात हाल केले. इस्लाम कबूल करून सर्व राज्य मुगलांच्या अधिन करण्याचा हूकूम सोडला. परंतु धर्मनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ महाराज झुकले नाहीत. तळघरात बंदी करून ठेवण्याचे आदेश दिले. तुळापूरच्या रस्त्यावरून त्यांना फरफटत नेले. विदुषकाचे कपडे घातले महाराज झुकले नाहीत. औरंगजेबाने महाराजांना किल्ले मागितले इस्लाम स्विकारण्याची जबरदस्ती केली महाराज झुकले नाहीत. शेवटी चिडून महाराजांचे डोळे काढण्याचा हूकूम दिला. आगीत तापलेल्या लाल सळ्या महाराजांच्या डोळ्यात घातल्या गेल्या महाराज झुकले नाही. सारी छावणी भितीने थरथरत होती परंतु महाराजांच्या तोंडातून चकार शब्दही बाहेर पडला नाही.त्यामुळे कवी कलशांचेही डोळे काढण्यात आले. महाराज डगमगले नाहीत पुढची शिक्षा म्हणून महाराजांची जीभ कापण्यात आली.ह्या सर्व हालअपेष्टा महाराजांनी ४० दिवस सहन केल्या. आणि ११ मार्च १६८९ भीमा इंद्रायणी संगमावरील देवाची आळंदी जवळच्या तुळापूर येथे महाराजांची क्रूरपणे हत्या करण्यात आली.
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे व धर्माचे रक्षण केले. हिंदू समाज कायम त्यांचा ऋणी आहे.
*हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची गाथा आणि इतिहास सांगणारी ही कविता👇*
*अमावस्येच्या अंधारातून तेजपुरुष हा लखलखला |*
*यमालाही पडले कोडे कुठे उगवली ही ज्वाला |*
*सह्याद्रीच्या गाभाऱ्यातील वाघाचा हा छावा |*
*मर्दानी छातीमधूनी वाहतो लाल लहवा |*
*एक एक शब्द शंभूचा जणू तलवार झुंजावी रणी |*
*त्याहूनी तिक्ष्ण नजर ती जडली जख्मी वाघावानी |*
*चकीत झाली औरंगशाही पाहूनी शंभूचा रोष |*
*तख्तच सुटले औरंग्याचे झाला तो बेहोश |*
*औरंग्याचा माज उतरला ऐकुनी शंभूवाणी |*
*म्हणे धर्मासाठी प्राण देण्या का हे उताविळ सेनानी |*
*जीभ छाटली, डोळे फोडले केले अनंत अत्याचार |*
*परि न हरलं मृत्युलाही हे सह्याद्रीच निधड वारं |*
*खोळंबला तो यमही थकला ताटकळला काळ |*
*दिवस सरले बारा न हरला सह्याद्रीचा बाळ |*
*मृत्युंजय झाली रात्र झाली अमावस्या मृत्युंजय आज |*
*मृत्युंजय झाले शंभू, उमटला तुळापूरी निनाद |*
*ज्योत मालवली अंतरीची आई, चिंता तुज जगाची |*
*शिवशंभूने वाट दाविली आम्हाला शक्ती दे म्लेंछ वधाची |*
⛳🚩🚩🚩⛳
*संदेश*
*प्रसंगी प्राणांची आहुती द्यावी लागली तरी बेहत्तर परंतु धर्म सोडणार नाही असा संदेश आपल्या दिग्भ्रमीत झालेल्या हिंदू बांधवांना समाजाला आपले सर्वोच्च बलिदान देऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी दिली आहे. व यातून आपणा सर्वांंना कर्तव्यबोधाची प्रेरणा व उर्जा देत नेहमीकरिता छत्रपती शंभूराजे अमर झालेत.*
🙏🕉️🙏
🚩विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत 🚩
⛳🚩🚩🚩⛳