उपाध्यक्ष अनंत जाधव यांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे
भाजपा नेता च मनपाला इशारा
भाजपाचा महापालिकेत कचरा टाकण्याचा इशारा
- उपाध्यक्ष अनंत जाधव यांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे
सोलापूर : प्रतिनिधी
शहरात मोठ्या प्रामणात कचरा साठाल आहे. सणाच्या काळात शहरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. याल महापालिका आणि कचरा संकलन करणारा मक्तेदार जबाबदार आहे. दोन दिवसात महापालिका प्रशासनाच्या वतीने जादा यंत्रणा लावून शहर स्वच्छ करावे अन्यथा महापालिकेच्या आवारात कचरा टाकण्याचा इशारा भाजपाचे उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.
शहरातील कचरा संकलनाचे मक्ता महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीला तब्बल 42 कोटीचा मक्ता दिला आहे. घंटा गाड्या देखिल दिल्या आहे. मात्र वॉटरग्रेस या कंपनीने शहरातील कचरा उचलण्यासाठी पोटमक्तेदार नेमले आहेत. वाटरग्रेस कंपनीकडे घंटागाड्या नाहीत, कर्मचारी नाहीत. कोणतीही यंत्रणा नसताना मक्ता दिलाच कसा हा प्रश्न निर्माण आहे. कचरा संकलन करण्याची क्षमता नसताना वाटरग्रेसला मक्ता देण्यामागे महापालिका आधिकारी आणि मक्तेदार यांच्यामध्ये मिलीभगत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असताना देखिल कारवाई केली जात नाही शहरात नवरात्र उत्सवाची धामधुम चालु आहे. मात्र शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. ठिक ठिकाणी कचार्यांचे ढिगारे साठले आहे. शहरात सर्वत्र घाणी साम्राज्य निर्माण झाले आहे. लोकप्रतिनिधीनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसात शहर स्वच्छ नाही केल्यास महापालिका प्रशासना परिणाम भोगावे लागतील असा इशारा जाधव यांनी दिला आहे.
कोट ़:
शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साठा आहे. मक्तेदारांला पोसण्याचे काम चालू आहे. दोन दिवसात शहर स्वच्छ नाही केल्यास शहरातील साठलेला कचरा महापालिकेच्या आवारात टाकला जाईल.महापालिकेतील अधिकार्यांमुळे भाजपची बदनामी होत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना एसएमएसच्या माध्यमातून कल्पना दिली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री, उपमख्यमंत्री सोलापूर दौर्यांवर येणार आहे. त्यावेळी भाजपाच्या वतीने मक्ता रद्द करण्याची मागणी करणार
आहे.
अनंत जाधव : उपाध्यक्ष भाजप माजी नगरसेवक
आयुक्त महापालिका