politicalindia - worldmaharashtrasolapur

उमेदवारी बदलण्यासाठी निष्ठा बदलावी लागते हे दुर्दैवच.

उमेदवारी बदलण्यासाठी निष्ठा बदलावी लागते हे दुर्दैवच.

महाराष्ट्र येत्या काही दिवसात विधानसभा  निवडणुकीत लागतील त्याआनुसंगणे सर्वत्र निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे त्यात सोलापूर तर मागे कसे राहणार सर्वच पक्षात उमेदवारी साठी भाऊ गर्दी जमली आहे. देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी झाले आणि भाजपचे कार्यकर्त्यांना तिसऱ्यांदा अच्छे दिन आले. त्यामुळे भाजपा मध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. सोलापूर मध्ये सद्या बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्याच्याच भाग म्हणून दक्षिण विधानसभा मतदारसंघ गाजतो या मतदार संघात आ. सुभाष बापू देशमुख विरोधात स्वपक्षतील कार्यकर्ते “बापू “नको असा उसने आवसान आणत थेट सागर बंगला गाठला. सुभाष देशमुख तस लढवय्या नेतृत्व अनेक निवडणुका वेगवेगळ्या मतदारसंघातुन लढवत आपले वेगळे अस्तित्व पक्षात निर्माण केले. 2014 विधानसभा निवडणूकीत भाजप शिवसेना युती तुटली आणि सुभाष बापूंच्या नशीबी नवा संघर्ष उभा राहिला. भाजपचे अस्तित्व नसलेले दक्षिण सोलापुर विधासभा निवडणुकीला उभे राहवे लागले. तसा हा मतदार संघ काँग्रेस चां बालेकिल्ले. एक दोन भाजपा नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत तर नाहीच अशा वाईट अवस्थेत बापूंनी हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात घेतला. हीच गोष्ट पक्षांतर्गत नेत्यांना खुपली आणि सुभाष देशमुख विरोधात कारस्थान सुरू झालं अशा कूटनीती ला दुर्लक्ष करीत मतदार संघात केंद्र, राज्य सरकार कडून मोठया प्रमाणात निधी आणत मोठा विकास केला शहराचा हद्वावाढ भाग मूलभूत सुविधांपासून वंचित होता. या भागात कोट्यवधी निधी आणून विकास कामे केली .ग्रामीण भागात रस्त्याची समस्या मोठ्या प्रमाणत सोडवली विकास कमा बरोबरच भाजपचे संघटन वाढविले . मतदारसंघात पहिल्यांदाच मनपा मध्ये 12ते14 नगरसेवक, पंचायत समिती,जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सदस्य निवडून आणले. महानगरपालिकामध्ये सुभाष देशमुखाच्या प्रयत्नाने  पहिल्यांदा मनपा मध्ये सत्ता मिळाली. अनेक नवखा कार्यकर्त्यांना नगरसेवक केले . मनपा विविध समिती वर काम करण्याची संधी दिली सुभाष देशमुकाची ही घोडदौड पक्षांतर्गत विरोधना बोचत होती. ती धग विधानसभा निवडणूक चा निमित्ताने बाहेर आली. ज्या कार्यकर्त्यांना सुभाष देशमुखांनी नगरसेवक, पक्षनेता ,उपमहापौर, शासकीय समिती, बाजार समिती अशा अनेक ठिकाणी काम करण्याची संधी दिली अशा कार्यकर्त्यांकडून बापूचा घात होत असेल तर दुर्दैवच. उमेदवारी मागणे हा लोकशाहीचा भाग असू शकतो पण व्यक्तीद्वेष हा मानसिक आजार विकासाला मारक ठरतो. उमेदवारी बदला या हाटहासापोटी निष्ठा बदलावी लागते हे दुःख आ. सुभाष देशमुख सारख निष्ठावान कार्यकर्त्याला कसे पचनी पडेल हे येणारा काळच ठरवेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button