सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा प्राप्त
सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाला यश
सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा प्राप्त
सोलापूर (प्रतिनिधी)
दक्षिण तालुक्यातील हत्तुर येथील सोमेश्वर व बनसिद्धेश्वर मंदिर देवस्थान हे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे केंद्र आहे. या देवस्थानाला राज्य निकष समितीने ब वर्ग दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आ. सुभाष देशमुख यांनी सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता, अखेर त्याला यश आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्जा देण्याबाबत शासन निर्णयानुसार प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या संदर्भात राज्य निकष समितीच्या बैठकीत सोमेश्वर व बनसिद्धेश्वर देवस्थानाचा प्रस्ताव आ. देशमुख यांनी सादर केला होता. या समितीने तीर्थस्थळाला ब वर्ग दर्जा प्रदान करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
दोन्ही तीर्थक्षेत्र क्षेत्राला ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने सरकारकडून अधिक वित्तीय सहाय्य, विकास योजना आणि योजनेंतर्गत आधारभूत सुविधांची उपलब्धता होणार आहे. देवस्थानाला सरकारकडून विविध योजनांमधून अधिक आर्थिक मदत मिळेल, ज्यामुळे त्याच्या विकासासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होणार आहे.
चौकट
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
दोन्ही तीर्थत्रेला ब वर्गाचा दर्जा मिळाल्यामुळे धार्मिक पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा विकास केला जाईल, मंदिराचे महत्त्व आणि भक्तांचे आकर्षण वाढणार आहे. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले