संघ स्थापनेमागचा उद्देश
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*मला समजलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. भाग – ५*
*संघ स्थापनेमागचा उद्देश*
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.श्री.केशव बळीराम हेडगेवार हे काँग्रेसमध्ये सक्रिय होते व देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी होते. अनेक प्रसंगी त्यांच्या लक्षात आले, की स्वयंशिस्त – सुसंस्कारित तरुण घडला पाहिजे, परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या कार्यामुळे या गोष्टीकडे काँग्रेसही लक्ष देऊ शकत नव्हती व नेते मंडळीही काही करू शकत नव्हते. दुसरीकडे हिंदू धर्म – संस्कृतीबद्दलचा अभिमान संपत चालला होता, अशा परिस्थितीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या भारत देशाच्या अखंडतेची व पुनर्वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न डॉक्टरांना भेडसावत होता.
आपल्या भारतभूमीला मातृभूमी मानणारा, पितृभूमी मानणारा, या भूमीमध्ये होऊन गेलेल्या राम – कृष्ण यांना दैवते मानणारा, भगवान गौतम बुद्ध – महावीर या तिर्थंकरांना आदर्श मानणारा, छत्रपती शिवाजी महाराज – महाराणा प्रताप यांना महापुरुष मानणारा केवळ आणि केवळ हिंदू समाजच आहे. या हिंदू समाजाला संघटित करणे व सुसंस्कारित तरुण पिढी उभा करणे हाच यावरचा उपाय आहे हे लक्षात घेऊन डॉ.हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करण्यामागचा उद्देश संघाच्या प्रार्थनेमध्येच आला आहे. भारत देशाला परमवैभवाला (महासत्ता) घेऊन जाणे हाच संघाचा उद्देश आहे. या राष्ट्राचे भले व्हावे असं वाटणा-र्यांचं संघटन करणे आणि राष्ट्रहितामध्येच माझं हित आहे अशी भावना असणारी सुसंस्कृत पिढी निर्माण करणे व यातून राष्ट्राला परमवैभवाकडे नेणे हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापनेमागचा उद्देश आहे.
– डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मो.क्र.७५८८२१६५२६
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻