-
गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची मुख्य मागणी मराठा समाजाला ओबीसीचा आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी घेऊन बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब यांच्याकडे विधानसभेचे विशेष अधिवेशन घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी व सर्वच आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे व हे अधिवेशनाची मागणी लवकरात लवकर मान्य केले जावे यासाठी आमदार राजाभाऊ राऊत हे दिनांक १२-९-२४ पासून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा शिवसृष्टी बार्शी येथे मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहेत तरी महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या वतीने विनंती आहे की आपल्या आरक्षणाच्या लढाईतील सर्वात महत्त्वाची मागणी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे याचं राजकारण न होता सर्वच राजकीय पक्षांची व आमदारांची भूमिका मराठा समाजासमोर आली पाहिजे यासाठी होणाऱ्या या महत्वपूर्ण लढाईला पुढे घेऊन जाणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांच्या या मागणीला पाठबळ देण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व मराठा समाजाच्या मागणीची एकीची आणि विचाराची ताकद दाखवून द्यावी विनंती.*