नुकताच संभाजी बिग्रेड या राजकीय संघटने चे अधिवेशन झाले मुळात ही संभाजी बिग्रेड स्वतंत्र विचारांची संघटना असली तरी ती छुपी “शरद बिग्रेड” प्रमाणेच काम करते आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मविआची स्क्रिप्ट हाताळत आहे का अशी शंका निर्माण होत आहे. भाजपा हा मुळात: हिंदुत्ववादी पक्ष असल्याने हिंदू देव देवतांनाचे उदात्तीकरण करणे स्वाभाविक आहे. पण भाजपा हिंदुत्वाला थेट विरोध केल्यास राजकीय नुकसान होईल, म्हणून आपली बी टीम म्हणून परिचित संभाजी बिग्रेडच्या संघटनेला हाताशी धरून शरद पवार हिंदू धर्म आणि परंपरेवर हल्ला करत आहेत.
थोडक्यात काय तर ‘पाहुण्याच्या हातून साप मारणे, शरद पवारांच्या “कु कारणास” संभाजी बिग्रेड हे सपशेल बळी पडल्याचे धोतक म्हणजे नवी मुंबई चे संमेलन होय. ज्ञानेश महाराव यांनी तर हिंदू देवा बद्दल आपली विषारी वृत्ती दाखवून दिली. रामायणा वर आधारित नाटकाचे संदर्भ देत महाराव यांनी राम ,सीता, लक्ष्मण,उर्मिला यांच्या संवादाचे दाखल देत हिंदू धर्माचे श्रध्दास्थान असलेले श्रीराम यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
शिवाय दूरदर्शन वरील मालिकेतील घटनेची दखले देत श्री समर्थांच्या देह बोली, समर्थानी परिधान केलेले वस्त्र यावर भाषय करत स्वामी समर्थांवर उपरोधिक टिपणी केली. “अंधश्रध्दा” या गोंडस नावाखाली आपले विखारी वृत्तीचे विचार विकण्याच्या प्रयत्न महाराव यांच्याकडून होताना दिसून आला.भारतीय राज्यघटनाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य या अधिकाराचा मनसोक्त लाभ घेत याच राज्य घटनेने दिलेले धार्मिक स्वतंत्र व कोणाची धार्मिक भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्या हा संविधानाचा सल्ला वजा गुन्हा महाराव सोईस्कर पणे विसरून गेले ..
संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे पुरस्कृत पुरोगामी टोळक्यांना हिंदू धर्मश्रद्धा व धर्मसंस्था या नेहमीच बोचत आली आहे. पुरोगामीत्व स्वीकारणाऱ्या टोळक्यांना इस्लाम, ख्रिश्चन या धर्मा मधील धार्मिक बंधने दिसत नाहीत, यावेळी हे टोळके सोईस्कर पणे बोलणे टाकताना दिसून येतात. हिंदू देवता आणि हिंदू मंदिरावर भाष्य करणारे पुरोगामीत्वाचे ठेके घेतलेले मशीद मधून निघणारे फतवे मुस्लिमांकडून होणारे धर्मांतर शिवाय फादर कडून धर्मप्रसार करण्यासाठी टाकलेली लालच ही सोयीस्करपणे हे पुरोगामित्व सांभाळणारे टोळके विसरून जातात आणि हिंदू आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मात्र गरळ ओखताना दिसून येतात.
अनादी काळापासून या भारत भूमीवर विविध धर्माचा उदय झाला त्याच धर्माच्या अनुयायी अनादी काळापासून गुण्यागोविंदाने राहत आहेत मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये मुस्लिमांच्या आक्रमणानेच विधवंशाला सुरुवात झाली हा विध्वंस बादशहा गेल्यानंतर थांबेल अशी अपेक्षा होती.पण विध्वंस स्वतंत्र भारतात नव्या म्हणजेच शहरी नक्षलवाद या नव्या पद्धतीने केला जाताना दिसून येतो आहे हिंदू धर्मात जन्माला आलेल्या पुरोगामित्व सांभाळणाऱ्या टोक्यानी आजपर्यंत हेच चालू ठेवले यांची खंत वाटते …