विकासाचा मळा फुलला,आनंदला शेतकरी*
विकासाचा मळा फुलला,आनंदला शेतकरी*
सांगली -अहिरवाडी / विविध विकास कामांचा शुभारंभ
सांगली –अहिरवाडी येथे मातोश्री पाणंद योजना अंतर्गत म्हसोबा मंदिर ते वाळवा कामेरी रस्ता पाणंद रस्ता मुरमीकरण ( १८ लक्ष ), या विकास कामांचा शुभारंभ भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष मा.निशिकांत भोसले पाटील (दादा) यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबीत असलेल्या विकास कामांना निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांच्या विशेष प्रयत्नातुन गावांसाठी भरघोस निधी मंजूर केल्या बद्दल निशिकांत भोसले – पाटील (दादा) यांचा सत्कार ग्रामस्थ व शेतकरी यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी भाजपा प्रदेश निमत्रिंत सदस्य प्रसाद पाटील, ससरपंच बाळासो यादव,वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष निवास पाटील,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे,संघटन सरचिटणीस संदीप सावंत, ओ बी सी तालुका अध्यक्ष मधुकर हुबाले, ग्रामपंचायत सदस्य दीपक यादव, माजी सरपंच अरुण यादव,शिवदास यादव,शुभम पवार,शिवाजी खामकर,प्रकाश यादव,प्रवीण यादव,गुणवंत यादव,अनिकेत पाटील,पांडुरंग यादव,सौरभ यादव,युवराज खामकर, अनिल यादव,सूरज पवार,हणमंत पवार, मनजीत यादव आदी मान्यवर ग्रामस्थ शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.