भारताची संस्कृती – जीवन पद्धती
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मला समजलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. भाग – १
भारताची संस्कृती – जीवन पद्धती
या पृथ्वीतलावर मनुष्याचा जन्म झाल्यानंतर लगेचच मनुष्य सुसंस्कारित जीवन जगत नव्हता. भटकं जीवन, रानटी जीवन जगत असतानाच एकत्र राहण्यासाठी काही निती-नियम एकमेकांना त्याकाळी घालून दिले गेले असावेत. या निती-नियमांनाच धर्म असे संबोधले जाते, याचाच अर्थ धर्म म्हणजेच आचार – विचार – व्यवहारांची चाकोरी अथवा जीवन पद्धती होय.
अनादी कालापासून भारतामध्ये एका विशिष्ट पद्धतीने लोक आपला आचार – व्यवहार करत आहेत, त्या आचार – व्यवहारातूनच काही रुढी व परंपरा निर्माण झाल्या. या रुढी व परंपरा यांनीच पुढच्या काळामध्ये धर्माचे स्वरूप घेतले. आमच्या धर्मामध्ये असे चालते अथवा असे चालत नाही असे म्हणण्याचा प्रघात आला. भारत भूमीच्या या मातीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने ही जीवन पद्धती आचरली, सांभाळली व पुढच्या पिढीकडे सुपूर्द केली. त्यामुळेच या भूमीमध्ये आजपर्यंत ही आचरण पद्धती ज्यांनी-ज्यांनी स्वीकारली, त्या साऱ्यांनाच एका धर्मामध्ये गोवले गेले आहे. या भूमीला आपली मातृभूमी-पितृभूमी मानणाऱ्या, येथील महापुरुषांना आपले आदर्श मानणाऱ्या लोकांना हिंदू असे म्हटले जाते. सनातन काळापासून चालत आलेली जीवन पद्धती स्वीकारणारे सारेच हिंदू आहेत, ही भावना सर्वोच्च न्यायालयाने देखील एका प्रकरणांमध्ये सुचित केली आहे. या भूमीत राहणारा, या भूमीवर प्रेम करणारा प्रत्येक जण हिंदूच आहे. हीच आपली संस्कृती आहे व हाच आपला धर्म आहे.
– डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मो.क्र.७५८८२१६५२६
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻