म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली*
मला समजलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. भाग – ४*
- *…….म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली*
- हिंदू धर्मातील जी अंतर्गत दुफळीमुळे इंग्रजांनी कायमच मुस्लिम समुदायाची बाजू उचलून धरली. विशेषतः गौरी गणपती व नवरात्रीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांकडून हिंदूंची घरे लुटली जाऊ लागली, यामध्ये हिंदूंना संरक्षण देण्याऐवजी इंग्रजांनी मुस्लिमांना मदत करण्याचे काम केले, त्यातच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व करणाऱ्या हिंदू पुढार्यांनी देखील हिंदूंची बाजू घेण्याऐवजी मुस्लिमांना गोंजारनेचे काम केले.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करण्यासाठी सन १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना होऊन देखील पुढच्या काळात सन १९०६ मध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. इंग्रजांनी हिंदू व मुस्लिम बहुल असणाऱ्या दोन प्रांतांची निर्मिती करून बंगालची फाळणी सन १९०५ मध्ये केली, यापासून प्रेरणा घेऊन मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली होती. महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय सभेचे अर्थात काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर खिलाफत चळवळीला पाठिंबा देणे, प्रत्येक वेळेस मुस्लिमांचे लांगुलचालन करणे, मुस्लिमांचा वंदे मातरमला असणारा विरोध स्वीकारणे, हिंदू – मुस्लिम दंग्यांमध्ये मुस्लिमांची बाजू घेणे यासारखे प्रकार वारंवार घडायला लागल्यानंतर या भारत भूमीला मातृभूमी, पितृभूमी मानून या भूमीमध्ये आजपर्यंत जे महापुरुष होऊन गेले, त्यांना आपला आदर्श मानणाऱ्या हिंदू समाजाचे संघटन झाल्याशिवाय या देशाला स्वातंत्र्य मिळून देखील ते टिकणार नाही व त्याचा काही उपयोग होणार नाही हे लक्षात घेऊन काँग्रेसच्या चळवळीमध्ये सक्रिय असणाऱ्या डॉ.श्री.केशव बळीराम हेडगेवार यांनी सन १९२५ सालच्या विजयादशमी दिवशी हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.